दिपस्तंभ

पडल्याजागीच चाचपडून पहावं
विकारांचं अस्तित्व
आत्म्याच्या गाभा-यात
आणि त्या गर्द पोकळीत
हात नुसताच फिरत रहावा..
जाणवू नयेत,
ओळखीचे स्पर्श
मखमली संदर्भ
कळावं
ह्या गाभा-यात आता नांदतो
फक्त गार काळोख...!
घ्यावं समजून की
आपण गाठलाय शांततेचा किनारा
आणि किनाऱ्यावर हा गाभारा
श्रांत, निश्चल उभा आहे...
तेव्हा
तेववून टाकावा
नंदादीप या गाभा-यात
आणि मिणमिणू द्यावा सर्वत्र ... हलका.. मऊ उजेड
कोण जाणो,
वादळात वाट चुकलेल्या
एखाद्या मुसाफिराला
जाईल गवसून किनाऱ्याची दिशा

एका श्रांत, तटस्थ दिपस्तंभामुळे!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments